मौन परिसर

श्री पांडुरंग महाराजांनी देह ठेवल्यावर त्यांच्या स्मरणार्थ येथे बांधलेल्या छोट्याश्या मंदिराचे नूतनीकरण करून त्याठिकाणी आता एक मजली टुमदार इमारत बांधण्यात आली आहे. खाली एक छोटे सभागृह असून, मंदिराच्या गजबजलेल्या परिसरापासून थोडेसे दूर असल्याने, साधकांना जप करण्यासाठी येथे अत्यंत शांतता मिळते. वरच्या मजल्यावर ग्रंथ विभाग असून आतापर्यंत श्रीमहाराजांविषयी व संस्थान विषयी वेळोवेळी प्रकाशित झालेले विविध अंक, स्मरणिका, पुस्तके याचा संग्रह करण्यात आला आहे.