आईसाहेब मंदिर व ब्रह्मानंद सभामंडप

आईसाहेबांनी १९१८ साली देह ठेवल्यावर समाधिमंदिराच्या जवळच त्यांचे छोटेसे मंदिर बांधण्यात आले. त्यासमोरील अंगणात सुमारे ३५०० स्क्वे. फुटांचा ब्रह्मानंद सभामंडप सुमारे १२ वर्षांपूर्वी तयार झाला. एकावेळी साधारणत: ८०० लोक बसु शकतील असा प्रशस्त व हवेशीर मंडप सर्वांच्या पसंतीला उतरला. स्टेज प्रशस्त आणि आतील व्यवस्थाही नेहमीप्रमाणे साधीच आहे पण उत्सवातील उत्तमोत्तम कार्यक्रम तिथे होतात व अनेक प्रवचनकार, कीर्तनकार व नामवंत गायक आज याठिकाणी श्रीमहाराजांच्या चरणी आपली सेवा रुजू करतात.