गोशाळा

सकाळी काकडआरतीचे वेळी व संध्याकाळीही गोमातेची आरती करून नैवेद्य (गोग्रास) दाखविण्याची पद्धत अगदी सुरुवातीपासून आजपर्यन्त चालू आहे. पूर्वी ६-७ गायी व ४ बैल होते. आज सर्व मिळून ५०च्या वर आहेत. गोशाळा सध्याच्या स्वयंपाकघराला लागून होती. कोठी स्वयंपाकघरापासून दूर होती, ती गोशाळेच्या जागी आणून स्वयंपाक घराला मदत होईल अशी योजना केली तर आधुनिक गोशाळा कुर्तकोटी इमारतीमागे बांधून झाली. बाजूलाच नवीन अत्याधुनिक गोबरगॅसची उभारणी झाली आहे. मंद अग्नीवर दूध तापविण्यासाठी त्याचा उत्तम उपयोग होतो आहे.