कार्यवाह, ‘चैतन्योपासना‘
श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज संस्थान
पोस्ट गोंदावले बुद्रुक, ता. माण, जिल्हा सातारा, महाराष्ट्र ४१५५४०
ऑफिस दूरध्वनी क्र. ०२१६५-२५८२९२
श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले गोंदावले हे महाराष्ट्रातील अग्रगण्य तीर्थक्षेत्र आहे. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यामधे, पुणे-पंढरपूर रस्त्यावर साताऱ्यापासून अंदाजे ६४ कि.मी. वर गोंदावले बुद्रुक हे गाव आहे. पुण्याहून (१५३ कि.मी.) व मुंबईहून (३२० कि.मी.) येण्यासाठी एस् टी महामंडळाची रोजची सेवा उपलब्ध आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग ४ मार्गे पुण्याहून येताना शिरवळ फाट्यापासून लोणंद -फलटण- दहिवडी मार्गेही गोंदवल्यास येऊ शकतो. तसेच महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर, पंढरपूर, ठाणे वगैरे बऱ्याच ठिकाणाहूनही बससेवा उपलब्ध आहे.
रेल्वेने गोंदवल्यास यायचे असेल तर पुणे-मिरज रेल्वेमार्गावरील कोरेगाव येथे उतरून पुढे बसमार्गे येथे येऊ शकतो.