श्रीब्रह्मचैतन्यमहाराज गोंदवलेकर यांचा जीवनपट

सन तपशील
१८४५ १९ फेब्रुवारी (माघ शुद्ध १२ शके १७६६) सकाळी गोंदवले येथे जन्म
१८५o श्रीमहाराजांचा व्रतबंध - नदीकाठी एकांतात ध्यानधारणा
१८५५ गुरूच्या शोधार्थ कोल्हापूरला प्रयाण
१८५६ खातवळच्या संभाजीराव गोडसे यांच्या कन्येबरोबर विवाह
१८५७ आजोबा लिंगोपंत यांचे निधन
१८५८ गुरूच्या शोधार्थ परत गृहत्याग, मार्गात हरिपूरच्या राधाबाई, मिरजेचे आण्णाबुवा, नाशिकचे देव-मामलेदार, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, हुमणाबादचे माणिक प्रभू, काशीमधील तेलंग स्वामी, बंगालचे रामकृष्ण परमहंस इत्यादींच्या भेटी. शेवटी समर्थ संप्रदायातील सत्पुरुष श्रीरामकृष्ण यांचा येहेळेगावच्या श्रीतुकारामचैतन्य यांच्याकडे जाण्याचा आदेश
१८५९ श्रीतुकामाईची येहेळेगाव येथे भेट. नऊ महिन्यांच्या खडतर सेवेनंतर अनुग्रह
१८६० गुरूंच्या आज्ञेनुसार नैमिषारण्याकडे प्रयाण
१८६१ श्रीमंत नानासाहेब पेशवे यांची नैमिषारण्यातील गुहेत भेट
१८६३ अयोध्या, काशी, वृन्दावन यात्रा करून कलकत्ता येथे हरिहाट
१८६४ इंदूरला उन्मनी अवस्थेत प्रकट
१८६५ गोंदवल्यास पुनरागमन - गृहस्थाश्रमास सुरुवात
१८७४ पत्नीसह श्रीतुकामाईंचे दर्शन. नंतर नाशिकला पत्नीस योगदीक्षा
१८७५ नाशिकहून इंदोर, काशी, अयोध्या, नैमिषारण्य इत्यादी ठिकाणी जाऊन गोंदवल्यास आगमन
१८७६ गोंदवल्यास भीषण दुष्काळ, दुष्काळी कामे, अन्नदान
१८७७ पुत्रप्राप्ती, पत्नी व पुत्राचे थोड्या दिवसांनी देहावसान
१८७८ वडील रावजी यांचे निधन. नंतर आटपाडीच्या देशपांडे यांच्या अंध मुलीशी विवाह
१८८०-९० पुन्हा भ्रमण. इंदूर येथे श्रीआनंदसागर व श्रीब्रह्मानंद श्रींना प्रथम भेटले व कालांतराने अनुग्रह - गोंदवल्यास पुनरागमन
१८९१-92 गोंदवले येथे थोरले श्रीराममंदिराची स्थापना
१८९४-९५ गोंदवले येथे धाकटे श्रीराममंदिराची स्थापना
१८९५ मातुश्री गीताबाईसह काशी, प्रयाग, अयोध्या यात्रा, अयोध्येस मातुश्रींचे निधन, इंदूर, हर्दामार्गे गोंदवल्यास आगमन
१८९६ पुन्हा नैमिषारण्यात निघाल्यावर श्रीरामरायाच्या डोळ्यातून अश्रुपात
१८९५-९६ सोलापूर व जालना, बेलधडी श्रीराममंदिरांची स्थापना
१९०० हर्दा येथे पट्टाभिषिक्त श्रीरामरायाची स्थापना
१९०१ यावंगलला श्रीदत्त मंदिर, गिरवी आणि मांडवे येथे श्रीराममंदिरांची स्थापना
१९०२ लो. टिळक व प्रो. जिनसीवाले यांच्या बरोबर वेदान्त चर्चा
१९०३ म्हासुर्णे व गोमेवाडी येथे श्रीरामाच्या मूर्तींची स्थापना
१९०५ प्रयागला बुडणाऱ्या नावेतून भक्तांना वाचविले
१९०६ नैमिषारण्याकडे प्रयाण, नानासाहेब पेशवे यांचा अंतकाल साधला
१९०८-०९ पंढरपूर व मोरगिरीला श्रीराममूर्तींची स्थापना
१९०९ श्रीरामरायाच्या डोळ्यातून अश्रुपात. आटपाडी, कुर्तकोटी व हुबळीस श्रीराममंदिरांची स्थापना
१९१० मुंबईस सर भालचंद्र भाटवडेकरांच्याकडे आठवडाभर वास्तव्य
१९११ कऱ्हाडला श्रीरामंदिराची स्थापना
१९१२ सिद्धेश्वर कुरोली येथे श्रीराममंदिराची स्थापना
१९१३ पंढरपूरला श्री. वल्हवणकरबुवांचे बरोबर अध्यात्म संवाद - गोंदवल्यास शनिमंदिर स्थापना
१९१३ २१ डिसेंबर गोंदवल्यास श्रीरामरायासमोर शेवटचे कीर्तन
१९१३ २२ डिसेंबर (मार्गशीर्ष वद्य १० शके १८३५) सकाळी श्रींचे महानिर्वाण