भक्त निवास

२५ वर्षांपूर्वी ६०-७० खोल्या होत्या. आज निवासासाठी जवळपास अडीचशे खोल्या आहेत. आता बऱ्याचशा नव्या इमारतीत भरपूर प्रकाशाची सोय, पंखे, खोलीला लागूनच स्वतंत्र स्वच्छतागृह व खाटा, गाद्या व उशा दिल्या आहेत. एवढे असले तरी मूळ साधेपण कायम आहे. सोयीचे रूपांतर विलासात होऊ नये याची दक्षता घेतलेली आहे. कुठेही भपका नाही. वातानुकूल सोय नाही आणि मूळ तत्त्व- ‘कशाचेच द्रव्य घ्यायचे नाही’- ते आजही अनुसरले जात आहे. आज भक्तनिवासासाठी श्रीराम, चैतन्य, आनंदसागर, डॉ. कुर्तकोटी, चिंतामणी, रामानन्द निवास या काळानुरूप अधिकाधिक सोयीच्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. तसेच गर्दीच्या वेळी विविध हॉल मध्ये भक्तांची सोय करण्यात येते.