


अक्षय्यतृतीया २०२३
श्रीराम समर्थ
आज या मंगल दिनी श्रीरामरायाकडे व श्रीमहाराजांकडे अक्षयदान मागूया,
आजपर्यंत जे काही दिले ते तुमचेच आहे. मी केवळ निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा मला तुम्ही भरपूर दिले. पुढील आयुष्य देखील तुमच्या कृपा आशीर्वादाने सुख, शांती, समाधान व आनंदाचे जाईल याची खात्री आहे पण त्यात तुमचे स्मरण सतत टिकू दे. मनाचा परिणाम शरीरावर होतो म्हणून मनात नेहमीच उत्तम विचार येऊ दे. तुमची सेवा अखंडित करण्यासाठी उत्तम आरोग्य मिळू दे. माझ्या जीवनात जे भोग असतील त्यातून पार पडण्यासाठी तुमचा हात नेहमी माझ्या मागे असू दे. व तुम्हाला प्रिय असे अक्षय नामस्मरण करण्याची शक्ति बुद्धी आम्हाला मिळो हीच प्रार्थना.
अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा !