विश्वस्त मंडळ 01 Oct 25 विशेष सूचना

विशेष योगदान

श्रीराम समर्थ 

या वर्षी महाराष्ट्र राज्यात सर्वत्र पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांवर पीकनुकसानीचे संकट कोसळले असून अतिवृष्टीग्रस्तांसाठी शासनाकडून मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. त्यास अनुसरून 
श्रीसद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर चैतन्योपासना ट्रस्ट या न्यासा मार्फत, मुख्यमंत्री सहाय्यता निधीस रू. ५० लाखाचा सहयोग निधी, महाराष्ट्र राज्याचे माननिय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना, दि.३०/ ९/२०२५ रोजी मंत्रालयात धनादेशाद्वारे सुपूर्त करण्यात आला आहे.

श्रीमहाराजांचे संस्थान ने जनसेवेसोबतच सामाजिक बांधिलकीही जोपासली आहे.

- विश्वस्त मंडळ