विश्वस्त मंडळ 25 Feb 26 विशेष सूचना

विशेष सूचना

श्रीरामरायाच्या आभूषणांना झळाळी 

गेले काही दिवस, एका भक्ताने श्रींच्या चरणी श्री रामरायासाठी सोन्याचे मुकुट अर्पण केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावरती फिरत आहे. 
प्रत्यक्षात श्रीरामरायाची नित्य वापरात असलेली आभूषणे, मुकुट, समया, दिवे वगैरे गोष्टी यांना पॉलिश, काही  दुरुस्ती, व सोन्याचा वर्ख वगैरे करण्याची गरज होती. संस्थानच्या सूचनेवरून ते काम काही भक्तांनी श्रीरामरायाची व श्रींची सेवा म्हणून अत्यंत काळजीपूर्वक व मेहनतीने केले. त्याचा व्हिडिओ नवीन मुकुट अर्पण करण्यात आले अशा गैरसमजुतीने प्रसारीत झाला. 
त्यांची सेवा शंभर नंबरी सोन्यापेक्षा कमी नाही या भावनेने ती समाधी स्थानी श्रींच्या चरणी अर्पण करण्यात आली आहे याची कृपया नोंद घ्यावी. पुढे अशा प्रकारची माहिती वा व्हिडीओ प्रसारित करण्यापूर्वी संस्थानकडून माहिती घेऊन परवानगी घ्यावी ही नम्र विनंती 
कळावे
आपले विश्वस्त
चैतन्योपासना, गोंदवले संस्थान