श्रीमहाराजांनी आपल्या जीवनात प्रसिद्धी व लौकिकाला फारच गौण स्थान दिले. नंतरच्या विश्वस्तांनीही तोच आदर्श ठेवून आजवर काम केले. पण आज या तंत्रज्ञानाच्या युगात, गोंदवले व श्री महाराजांविषयी विश्वासार्ह माहिती देणारे संस्थानचे अधिकृत संकेतस्थळ (वेबसाईट), या माहितीच्या महाजालात असणे ही काळाची गरज आहे. यादृष्टीने हे संकेतस्थळ श्रींचरणी अर्पण करण्यास आनंद होत आहे. या संकेतस्थळा बाबतीत आपल्या सूचना वा प्रतिक्रिया जरूर नोंदवाव्यात.

नवीन काय?

जेथे दिसे सद्गुरू चरण तेची आम्हा गोकर्ण
या श्री ब्रह्मानंद महाराजांच्या प्रसिद्ध अभंगावर यावर्षीच्या गुरूपौर्णिमा महोत्सवात श्री रवींद्र पाठक यांनी केलेली निरूपणे
स्थळ : श्री ब्रह्मानंद सभामंडप,गोंदवले

पुढे पहा..

आजचे प्रवचन

जेथे संत तेथे आनंद व समाधान असणारच.

काही संत वरून अज्ञानी दिसतात पण अंतरंगी ज्ञानी असतात. खरोखर, संतांची बाह्यांगावरून पुष्कळदा ओळख पटत नाही. संतांचे होऊन राहिल्याने, किंवा त्यांनी सांगितलेल्या साधनात राहिल्यानेच त्यांना नीट ओळखता येईल. मनातले विषय काढून टाकले म्हणजे संतांची प्रचीती येईल. आपले दोष जोपर्यंत नाहीसे होत नाहीत, किंवा लोकांचे दोष दिसणे जोपर्यंत बंद होत नाही, तोपर्यंत संतांची पूर्ण ओळख आपल्याला होणार नाही. संतांचे दोष दिसणे, म्हणजे आपलेच दोष बाहेर काढून दाखविण्यासारखे आहे. संत हा हिरव्या चाफ्याच्या...

पुढे पहा..

श्रीकृष्ण जन्माष्टमी २०१७

श्रीराम समर्थ 
श्री क्षेत्र  गोंदवले येथे जन्माष्टमी  उत्सव दरवर्षी प्रमाणे श्रावण वद्य प्रतिपदा  ते श्रावण वद्य  अष्टमी (८ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट)  दरम्यान  अत्यंत उल्हासात व भक्तिमय वातावरणात संपन्न...

पुढे पहा..

हाचि निरोप गुरूंचा

सीमोल्लंघन

श्रीराम समर्थ

दसरा म्हणजे सीमोल्लंघन ! आपण सीमित आहोत. देहबुद्धीने मर्यादित आहोत. ईश्वर हा दृष्यापलिकडे असल्याने असीम आहे. तो ‘आहे’ एवढेच सांगता येतं; हेच नाम ! म्हणून नाम घेणं हेच सीमोल्लंघन ! नाम व भगवंत एकरूप आहेत व...

पुढे पहा..

समर्थांचा दासबोध
(निरुपणे श्री रवींद्र पाठक )
निरुपण क्र. 592
दशक १५, समास ८, सूक्ष्मजीवनिरूपण

आगामी कार्यक्रम

गोकुळ अष्टमी उत्सव

८ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०१७

श्री क्षेत्र  गोंदवले येथे गोकुळ अष्टमीचा उत्सव ८ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट (श्रावण वद्य प्रतिपदा  ते श्रावण वद्य  अष्टमी )...

पुढे पहा..

वचन परिमळ