श्रीराम समर्थ
श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर संस्थान, गोंदवले यांच्या विश्वस्तांतर्फे श्रींच्या १०७ व्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त विशेष सूचना व नम्र विनंती.
महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व त्यांनी घालून दिलेल्या नियमानुसार श्रीक्षेत्र गोंदवले येथील श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे समाधी मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. परंतु उत्सवकाळात गर्दी झाल्यास करोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने सर्व भाविकांना कळकळीची विनंती करण्यात येत आहे की यावर्षी श्रींच्या स्मरणात आपापल्या घरीच उत्सव साजरा करावा. या अभूतपूर्व परिस्थितीमुळे उत्सवकाळात प्रसाद व निवास यांचीही व्यवस्था होणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. उत्सवकाळातील नित्य व नैमित्तिक उपासना व इतर सेवा या वास्तव्यास असणाऱ्या सेवेकरी व कर्मचारी वर्गाकडूनच यथासांग पार पडतील.
श्रींचा पुण्यतिथी उत्सव दि. ३१ डिसेंबर २०२० ते ८ जानेवारी २०२१ या कालावधीत श्रीक्षेत्र गोंदवले येथे अत्यंत साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. शासनाच्या सूचनेप्रमाणे उत्सवकाळात श्रींच्या दर्शनास येणाऱ्या भक्तांसाठी खालीलप्रमाणे व्यवस्था करण्यात येईल त्यांचे काटेकोरपणे पालन करावे-
उत्सवकाळात दर्शनाचे वेळापत्रक
दि ३१ डिसेंबर ते ६ जानेवारी – सकाळी ७ ते १०.१५ पर्यंत व दुपारी १२ ते सायं ७ वाजेपर्यंत
दि ७ व ८ जानेवारी – शासनाच्या सूचनेनुसार दर्शन पूर्णपणे बंद राहील
मात्र संस्थानच्या अधिकृत वेबसाईट लिंकवर आपण या उत्सव काळात दर्शनाचा लाभ खालील वेळेत जरूर घेऊ शकता.
सकाळी ४.४५ ते रात्रौ १० पर्यंत दररोज
१) मंदिरातील सभा मंडपातूनच श्रींचे दर्शन घेण्याची सोय वरील दिलेल्या दिवशीच करण्यात येईल. येणाऱ्या भक्तांना मंदिरातील पूजाअर्चा व इतर कोणत्याही उपासनेत सहभाग घेता येणार नाही. दर्शन झाल्यानंतर मंदिरातून लगेचच बाहेर पडायचे आहे. मंदिर परिसरात इतर कुठेही जाण्याची परवानगी नाही. सर्व भक्तांनी मास्क लावणे, 'दो गज की दूरी', सॅनीटायझर तसेच शासनाने घातलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे
२) निवासाची, प्रसादाची व वैद्यकीय सेवा इ. व्यवस्था होणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
संपर्कासाठी फोन : ०२१६५–२५८२९२, ७०५८०५९८४२, ९६२३१९७४८५, ७७४५०००३२६
४) बाहेरगावच्या भक्तांना, जपासाठी, सेवेसाठी गोंदवल्यात रहाण्याची व्यवस्था या कोरोनाच्या काळात होणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
बुधवार, दि. ३० डिसेंबर २०२० पौर्णिमेचीही यात्रा स्थगित केली आहे.
गोंदवले येथील वैद्यकीय वा इतर व्यवस्थांच्या मर्यादा लक्षात घेता या आजाराच्या साथीने काही गंभीर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून हे पाऊल उचलावे लागत आहे, कृपया भाविकांनी सहकार्य करावे.
सर्व भक्तांनी,या कोरोनाच्या काळात गोंदवले संस्थानाला वरील सूचनांचे पालन करून सहकार्य करावे ही पुनश्च विनंती. हे वैश्विक महामारीचे संकट लवकर दूर होऊन पूर्ववत परिस्थिती येण्यासाठी श्रींच्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना!