विश्वस्त समिती 06 Oct 21 विशेष सूचना

समाधीमंदिर दर्शन सुरु !

श्रीराम समर्थ

श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर संस्थान, गोंदवले यांच्या विश्वस्तांतर्फे विशेष सूचना व नम्र विनंती.

महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व त्यांनी घालून दिलेल्या नियमानुसार श्रीक्षेत्र गोंदवले येथील श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे समाधी मंदिर दिनांक ७ ऑक्टोबर २०२१ पासून दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. श्रींच्या दर्शनास येणाऱ्या भक्तांसाठी खालीलप्रमाणे व्यवस्था करण्यात येईल त्यांचे काटेकोरपणे पालन करावे-

दर्शनाची वेळ – सकाळी ९:०० ते १२:००, दुपारी ४:०० ते रात्री ८:०० वाजेपर्यंत

मंदिरातील सभा मंडपातूनच श्रींचे दर्शन घेण्याची सोय करण्यात येईल. येणाऱ्या भक्तांना मंदिरातील पूजाअर्चा व इतर कोणत्याही उपासनेत सहभाग घेता येणार नाही. दर्शन झाल्यानंतर मंदिरातून लगेचच बाहेर पडायचे आहे. मंदिर परिसरात इतर कुठेही जाण्याची परवानगी नाही. सर्व भक्तांनी मास्क लावणे, 'दो गज की दूरी', सॅनीटायझर तसेच शासनाने घातलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.

निवासाची, प्रसादाची व वैद्यकीय सेवा इ. व्यवस्था होणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. मात्र संस्थानच्या अधिकृत वेबसाईट लिंकवर आपण दर्शनाचा लाभ खालील वेळेत नेहमीप्रमाणे घेऊ शकता.

सकाळी ४.४५ ते रात्रौ १० पर्यंत दररोज
संपर्कासाठी फोन : ०२१६५–२५८२९२

पौर्णिमेची यात्राही पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगितच राहील. गोंदवले येथील वैद्यकीय वा इतर व्यवस्थांच्या मर्यादा लक्षात घेता या आजाराच्या साथीने काही गंभीर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून हे पाऊल उचलावे लागत आहे, कृपया भाविकांनी सहकार्य करावे.

सर्व भक्तांनी, हे कोरोनाचे सावट पूर्णपणे दूर होईपर्यंत, वरील सूचनांचे पालन करून गोंदवले संस्थानाला सहकार्य करावे ही पुनश्च विनंती. हे वैश्विक महामारीचे संकट लवकर दूर होऊन पूर्ववत परिस्थिती येण्यासाठी श्रींच्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना!.