विश्वस्त मंडळ 17 Mar 22 विशेष सूचना

दर्शन व व्यवस्था पूर्ववत

||श्रीराम समर्थ ||

कळविण्यास आनंद होतो की श्रींच्या कृपेने देशात व महाराष्ट्रात कोविड प्रादुर्भाव कमी झाल्याने, श्रींचे दर्शन व समाधी परिसरातील सर्व व्यवस्था पूर्ववत सुरु होणार आहेत. त्यामुळे भाविकांना आता पूर्वीप्रमाणे प्रसाद व निवास व्यवस्थेचा लाभ घेता येईल.

मात्र खबरदारी म्हणून कोविड विषयी मास्क व इतर सर्व नियमांचे पालन भक्तांनी करणे अनिवार्य असेल. तसेच २ लस घेतलेल्या व्यक्तींनाच प्रवेश मिळेल. निवास व्यवस्था सध्या फक्त दूरच्या भक्तांसाठी व केवळ एक रात्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येईल. ५ पेक्षा अधिक व्यक्ती निवासासाठी एकत्रपणे येणार असल्यास संस्थानच्या दूरध्वनी क्रमांकावर वा पत्त्यावर संपर्क करून पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असेल याची कृपया नोंद घ्यावी. अनुग्रह व अभिषेक नेहमीप्रमाणे सुरु होतील. दर महिन्याची पौर्णिमेची वारीही पूर्ववत सुरु होईल.

कोविड काळातील केलेल्या सर्व सहकार्याबद्दल सर्व भक्त मंडळींचे मनःपूर्वक आभार!

- आपले विश्वस्त मंडळ