यज्ञानां जपयज्ञोऽस्मि
श्री राम समर्थ
श्री ब्रह्मचैतन्य श्रीराम मंदिर, चिंतामणी
सर्व भक्तांना आणि नाम साधकांना नमस्कार आणि शुभेच्छा. "जीवनात सुख शांती समाधान साधण्यासाठी 'रामनाम जप' हा सर्वात सोपा मार्ग आहे असे श्रीमहाराजांनी अत्यंत कळकळीने सांगितले आणि लोकांनी नाम घ्यावे म्हणून आपले सर्व जीवन नामाकरिता वाहिले.
श्रीमहाराजांचा प्राण असणारे हे नाम सतत मुखात राहावे आणि नाम साधन वाढावे म्हणून या लोककल्याणासाठी सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांच्या कृपेने 2 ऑक्टोबर 2023 रोजी एका दिवसात तेरा कोटी (13 कोटी) जप करण्याचा संकल्प श्रीक्षेत्र चिंतामणी, कर्नाटक येथे केला आहे. एकूण 13,000 लोकांनी 4 तास जप केल्यास 13 कोटी जप एका दिवसात आपल्याला पूर्ण करता येईल. म्हणून सर्व साधक व उपासना मंडळांना विनंती करतो की त्यांनी मोठ्या संख्येने हा जपसंकल्प पूर्ण करण्यासाठी सहभागी व्हावे.
'भगवंताचे नाम घ्या ' असे सर्व संतांनी अनुभवसिद्ध सांगितले. भगवद्गीतेत श्रीकृष्ण परमात्म्याने “यज्ञानां जपयज्ञोऽस्मि " तर संत ज्ञानेश्वर महाराजांनी 'नित्य नामाची माळा । जिव्हे घे तूं गळाळा।' म्हणत आपल्याला नामाचे महत्त्व विषद केले. श्री ब्रह्मानंद महाराजांनी "ज्याने जीवनात परमप्राप्ती आणि सद्गगती प्राप्त करण्याची तळमळ ठेवली त्याने अखंड नामस्मरण करावे" असे मोक्षप्राप्तीच्या रहस्यांमध्ये प्रतिज्ञापूर्वक सांगितले.
या "रामनामजप" संकल्पामध्ये सर्व भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे अशी कळकळीची विनंती आहे. अधिकाधिक भक्तांना सहभागी होणे सोईचे व्हावे म्हणून आपापल्या ठिकाणी सामूहिक जप आयोजित करून या दिव्य तारक मंत्राचा जप करण्यास प्रोत्साहित करावे ही विनंती.
आपणास विनंती आहे की आपण कृपया या संकल्पात आम्हाला साथ द्यावी आणि आपली जपसंख्या आम्हाला 3 ऑक्टोबर रोजी या नंबरवर 98800 60440 कृपया इंग्लिश मध्ये कळवावी.
प्रभु श्रीराम सेवेत तुमचा.
गंजूर एच.व्यंकटेश मूर्ती
SBCSR मंदिर ट्रस्ट साठी