।। श्रीराम समर्थ ।।
गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन या वर्षी दि. ९ ते १६ जुलै २०१९ पर्यंत (आषाढ शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा) केले आहे. यात सप्ताहानिमित्त सात दिवस सकाळी ९ ते ११ समाधिमंदिरात श्रीसदगुरुलीलामृत पोथीचेपारायण; तसेच पुरुषांचा अखंड नामस्मरण व भजनाचा पहारा, तर स्त्रियांचा पहाटे ४ ते रात्री १० असा नामस्मरणाचा पहारा असेल. रोज सकाळी समाधिमंदिरात रुद्र अभिषेक व संध्याकाळी कीर्तनसेवा होईल.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी ८.३० वाजता रामदासी भिक्षा होईल व दुपारी पंचपदीभजन होऊन पहाऱ्याची सांगता होईल. गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रम :
(१) दि . १३, १४ व १५ जुलै २०१९ (आषाढ शु. १२,१३,१४) रोजी श्री. रविंद्र पाठक यांची प्रवचने.
(२) दि. ३ जुलै ते १२ जुलै २०१९ या कालावधीत ह.भ. प. संदीपबुवा मांडके (पुणे) यांचे कीर्तन.