शनिमंदिर

दत्तमंदिरानंतर श्री शनिमंदिराची स्थापना झाली. या स्थापनेला कारण म्हणजे, श्रीमहाराजांना साडेसाती होती तसेच ती. भाऊसाहेब केतकरांनाही होती. तेव्हा श्री म्हणाले, ’श्रीशनीचे दर्शनास दुसरीकडे कोठे जाणार? येथेच स्थापना करू. श्रीमहाराज शनीला देवांचा फौजदार म्हणून संबोधीत असत. या मंदिरातील शनिदेवाची मूर्ती अतिशय रेखीव असून नित्याची पूजा अर्चा व्यवस्थित चालते.