दत्तमंदिर

धाकट्या राममंदिराजवळच श्री दत्त मंदिर आहे. या एकमुखी दत्तमंदिराची स्थापना वैशाख शुद्ध पंचमी शके १८३३ (१७ मे १९११) रोजी झाली. दत्तात्रेयाची मूर्ती लहान असली तरी रेखीव आहे. श्रीदत्तांच्या एका बाजूस नृसिंहाची मूर्ती व एका बाजूस देवीची मूर्ती आहे. १९५९ च्या पुण्यतिथी उत्सवाच्या वेळी शतचंडी महायाग करण्यात आला व दत्तमंदिरात देवीची स्थापना करण्यात आली. १९९३ मध्ये या देवळाचा जीर्णोद्धार करताना समोर मोठा सभामंडप बांधण्यात आला.