श्रीराम समर्थ
श्रीक्षेत्र गोंदवले येथील श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव २०२४
श्रीक्षेत्र गोंदवले येथे दरवर्षी प्रमाणे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव श्रावण वद्य प्रतिपदा ते श्रावण वद्य अष्टमी (२० ऑगस्ट ते २६ ऑगस्ट) दरम्यान अत्यंत उल्हासात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. उत्सवकाळात दररोज अखंड नामस्मरण व टाळेवर भजनाचा पहारा होता. दररोज सकाळी श्री गोपालकृष्णास पवमान अभिषेक व श्रींच्या समाधिस रुद्र अभिषेक करण्यात आला. दररोज विविध फुले व पोशाख यांच्या सजलेल्या गोपालकृष्णाची सुवासिनींनी दृष्ट काढली.