श्रीमहाराजांनी आपल्या जीवनात प्रसिद्धी व लौकिकाला फारच गौण स्थान दिले. नंतरच्या विश्वस्तांनीही तोच आदर्श ठेवून आजवर काम केले. पण आज या तंत्रज्ञानाच्या युगात, गोंदवले व श्री महाराजांविषयी विश्वासार्ह माहिती देणारे संस्थानचे अधिकृत संकेतस्थळ (वेबसाईट), या माहितीच्या महाजालात असणे ही काळाची गरज आहे. यादृष्टीने हे संकेतस्थळ श्रींचरणी अर्पण करण्यास आनंद होत आहे. या संकेतस्थळा बाबतीत आपल्या सूचना वा प्रतिक्रिया जरूर नोंदवाव्यात.

गुरुपौर्णिमा २०१९- विशेष सूचना

सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या शिकवणीनुसार प्रत्येक साधकाच्या मनात आपल्याला जास्तीत जास्त नामस्मरण कसे करता येईल, हाच विचार असतो. हे उद्दिष्ट साध्य करण्याी संधी श्रीं च्या साधकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. दि. १ मे ते ३१ मे २०१९ या कालावधीत गोंदवले येथे साधकांना जप / नामस्मरण करता येईल. एका साधकाला जास्तीत जास्त आठ दिवस या उपक्रमात सहभागी होता येईल. इच्छुक साधकांनी गोंदवले संस्थान येथे श्री विवेक कुलकर्णी – मोबाईल क्रं. ९६२३१९७४८५ यांचेशी संपर्क साधावा, अथवा पत्राद्वारे कळवावे.

आजचे प्रवचन

'मी कोणीतरी आहे' ही वृत्ती घातक.

पुष्कळ लोकांच्या अडचणी ऐकून असा विचार मनात आला, की जगातल्या सर्व दु:खांचे मूळ, देहदु:ख आणि पैशाची टंचाई ह्यांत मुख्यत: साठविलेले आहे. या दोन्ही गोष्टींत जर मदत करता आली तर पुष्कळ लोकांना सुखी करता येईल असे वाटू लागले, आणि त्या दृष्टीने विचार सुरू झाला. पैशाचा विचार करता असे दिसले की, आपण लंगोटी घातलेली, जवळ पैसा नाही, आणि त्याचा लोभही नाही. आता दुसऱ्याला पैसा द्यायचा म्हटले, म्हणजे त्याचा प्रथम आपल्या ठिकाणी लोभ उत्पन्न केला पाहिजे, तरच तो मिळवावा अशी बुद्धी उत्पन्न होईल; नंतर पैसे...

पुढे पहा..

श्री क्षेत्र गोंदवले येथील रामनवमी उत्सव २०१९

येथील रामनवमीचा उत्सव यंदा ६ एप्रिल ते १३ एप्रिल २०१९ (चैत्र शु १ ते चैत्र शु ८) या कालावधीत थोरले राममंदिर येथे अतिशय उत्साहात संपन्न झाला. यात रोजची काकड आरती, ग्रामदेवता पूजन, धाकट्या राममंदिरातील रामपूजन तसेच...

पुढे पहा..

हाचि निरोप गुरूंचा

सीमोल्लंघन

श्रीराम समर्थ

दसरा म्हणजे सीमोल्लंघन ! आपण सीमित आहोत. देहबुद्धीने मर्यादित आहोत. ईश्वर हा दृष्यापलिकडे असल्याने असीम आहे. तो ‘आहे’ एवढेच सांगता येतं; हेच नाम ! म्हणून नाम घेणं हेच सीमोल्लंघन ! नाम व भगवंत एकरूप आहेत व...

पुढे पहा..

श्रीरामचरितमानस
(निरुपणे श्री रवींद्र पाठक )
निरुपण क्र. 0369
द्वितीय सोपान, अयोध्याकाण्ड-कथाचिंतन क्रमांक ३६९

आगामी कार्यक्रम

श्रीक्षेत्र गोंदवले येथे गुरुपौर्णिमा उत्सव

दि. ९ ते १६ जुलै २०१९

।। श्रीराम समर्थ ।।
गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन या वर्षी दि. ९ ते १६ जुलै २०१९ पर्यंत (आषाढ शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा) केले आहे....

पुढे पहा..

वचन परिमळ