जन्मस्थान (Art Gallary)

थोरले राममंदिराचे बोळात टोकाला श्रीमहाराजांचा वाडा होता. तेच त्यांचे जन्मस्थान. १५० वर्षांचा तो वाडा मोडकळीस आला होता. पण त्या पवित्र स्थानाचे जतन करणे हे आपले कर्तव्यच आहे या भावनेने त्याजागी श्रींचे स्मारक म्हणून चित्ररूप ओळख (Art Gallary) करायचे ठरविले.

आज त्या जागेला भेट देताना भक्तांना तर आनंद होतोच पण नवख्या व्यक्तीस अगदी थोड्या काळात श्रींचे चरित्र डोळ्यासमोर उभे राहते, ते प्रवेशद्वारावरील संगमरवरी दगडात कोरलेला श्रींचा जीवनपट वाचून. आत श्रींचा जिवंत भासावा असा संगमरवरी पुतळा, शिष्यमंडळींची फोटोद्वारे ओळख, श्रींचे हस्ताक्षरातील पत्रे, वापरातील वस्तू, त्यांचे दुर्मीळ फोटो, त्यांनी स्थापलेल्या राममंदिरांचे फोटो आणि त्यांच्या आयुष्यातील तीन घटनांची भव्य तैलचित्रे हे सर्व प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांच्या मनावर एक ठसा उमटवते.