धाकटे श्रीराममंदिर

थोरले राममंदिर स्थापन झाल्यावर श्रीमहाराजांचा व्याप झपाट्याने वाढत गेला. दर्शनाला येणाऱ्या मंडळींची संख्या जास्त वाढलीच, परंतु बाहेर गांवाहून येणाऱ्या पुष्कळ मंडळींना श्री आपण होऊन बरेच दिवस ठेवून घेऊ लागले. म्हणून इ. स. १८९५ साली श्रीमहाराजांनी धाकटे राममंदिर बांधले. सहकुटुंब येणाऱ्यांना उतरण्यास व सामान ठेवण्यास सोयीचे व्हावे म्हणून काही खोल्याही बाजूला बांधल्या. त्यावेळी श्रींनी गायत्रीपुरश्चरण व रुद्र स्वाहाकारही करविला. धाकट्या राममंदिरातील मूर्ति छोट्या असल्या तरी अतिशय सुबक आहेत. मंदिराच्या शेजारी शंकराचे मंदिर असून पिंडीवर बारा ज्योतिर्लिंगे आहेत. रामासमोरील दासमारुतीही अतिशय रेखीव आहे.